Uncategorized

कोरेगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपिका मुसळे निलंबित.

कोरेगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपिका मुसळे निलंबित; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची कडक कारवाई

कोरेगाव पोलीस ठाणे गेल्या काही काळापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. स्थानिक नागरिकांकडून आणि विविध प्रकरणांतील पक्षकारांकडून पोलीस ठाण्यातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी केल्यानंतर, शिस्तभंग आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील पोलीस दलात शिस्त आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुसळे यांच्या निलंबनाचे आदेश हे त्याच मोहिमेचा एक भाग मानला जात आहे. “कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा तक्रारी प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. दरम्यान, या निलंबनानंतर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कारभारात काय सुधारणा होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

2 Comments

  1. Maza pan sasu che sone chorle maza chulat dira ne ani tyane kabul pan kel January 19 la complaint keli ahe tari ajun kahich kel nahi koregav cha police ni shinde and balal polich ch nav jo maza dir ani tyachi bayko hye dogh jan ahet ani te swta fon kartat maza navrya la soy kartoy paishachi tari police trac karat nahi tyani paise khale 2 month zale tari kahich halchal nahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button