महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील दरे गावचा मातीचा सुगंध जपणारा,जवान शहीद..

  1. सातारा जिल्ह्यातील दरे गावचा मातीचा सुगंध जपणारा, भारतीय सैन्यात १७ मराठा लाइट इन्फंट्री, कोल्हापूर येथे कर्तव्य बजावणारा आपला शूर सुपुत्र हुतात्मा उदय सखाराम जाधव यांना अखेरची मानवंदना देताना संपूर्ण परिसर भावुक झाला.

अल्पशा आजाराशी झुंज देत असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेची शपथ घेतलेला हा वीर जवान आज आपल्यात नसला तरी त्यांचे राष्ट्रनिष्ठ आयुष्य सदैव प्रेरणादायी राहील.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई व दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेले हे दुःख अपरिमित आहे. या कठीण प्रसंगी जयहिंद फाऊंडेशन त्यांच्या परिवारासोबत खंबीरपणे उभे आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची अपार शक्ती देवो, हीच प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button