महाराष्ट्र

नृत्य साधना संस्थेच्या कलाकारांनी बहारदार शास्त्रीय भरतनाट्यम…

नृत्य साधना संस्थेच्या कलाकारांनी बहारदार शास्त्रीय भरतनाट्यम सादर केले. नटराज नृत्य कलाशाळा अन् नृत्य साधना संस्थेच्या भरतनाट्यमने नृत्य महोत्सवाची सांगता

सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात महाशिवरात्रीच्या रात्री सातारा येथील गुरु सौ. आचल घोरपडे यांच्या नटराज नृत्यकला शाळा आणि सुधांश किरकिरे यांच्या नृत्यसाधना संस्थेच्या कलाकारांनी बहारदार अशी भरत नाट्यम नृत्य सादर करून या महोत्सवाची सांगता केली.

कृष्णानगर परिसरातील श्री आनंद नटराज व श्री शिवकामसुंदरी देवी यांच्या कृपेने तसेच श्री कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती महास्वामी तसेच कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व सध्याचे पिठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती व त्यांचे शिष्य श्री श्री सत्यचंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या पूर्णाग्रह आणि शुभआशीर्वादाने

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत आणि महाशिवरात्री बद्दल माहिती देत केली. त्यानंतर या संस्थेविषयी स्मिता यांनी माहिती दिल्यावर गुरु आचल घोरपडे यांचे विषयी उपस्थित त्यांना माहिती देण्यात आली.

यानंतर सादर झालेल्या नृत्य कार्यक्रमात नृत्यसाधना संस्थेच्या वतीने.. शंभो.. या नावाने पस्तीस कलाकारांनी १३ बहारदार अशी भरतनाट्यम नृत्य सादर केली. नृत्यने रंगलेल्या बहारदार अशा नृत्य कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमानंतर गुरु सुधांश किरकिरे तसेच नटराज नृत्यकला शाळेच्या गुरु आचल घोरपडे व सहभागी कलाकारांचा नटराज मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रमाणपत्र सन्मान योजना व प्रसाद देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीश शाखी भट्ट गुरुजी, वासुदेवन नायर, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, नारायण राव श्री उत्तर चिदंबरम नटराज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button