महाराष्ट्र

आपला प्रभाग स्वच्छ ठेवा उघड्यावर कचरा टाकू नये : युवा नगरसेवक रविराज किर्दत यांचे आव्हान

आपला प्रभाग स्वच्छ ठेवा उघड्यावर कचरा टाकू नये : युवा नगरसेवक रविराज किर्दत यांचे आव्हान; पालिकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं नाही तर मला सांगा रविराज किर्दत

प्रभाग क्रमांक 6 मध्ये घंटागाडी व ट्रॅक्टर नियमित येत असतानाही काही ठिकाणी नागरिकांकडून जागोजागी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार त्वरित बंद करणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन प्रभागाचे नगरसेवक युवा नगरसेवक रविराज किर्दत यांनी केले आहे.

“ काही किरकोर नागरिकांच्या चुकीमुळे संपूर्ण प्रभागाचे नाव खराब होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे त्यामुळे कोणीही रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा कोपऱ्यावर कचरा टाकू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कचरा टाकताना आढळणाऱ्या व्यक्तींचे फोटो किंवा व्हिडिओ नागरिकांनी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्याची जबाबदारी स्वतः रविराज किर्दत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक-दोन वेळा सूचना देऊनही सुधारणा न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. “आपला प्रभाग, आपली जबाबदारी,” असे सांगत नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक रविराज किर्दत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button