छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे शनिवार,२७ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे शनिवार,२७ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा घटक महाविद्यालयाच्या वतीने शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी ” २१ व्या शतकातील साहित्य आणि सिनेमांमध्ये चित्रित स्त्री जीवन ” या विषयावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सदर परिषद महाविद्यालयाच्याच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व भाषा विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे ह्या मार्गदर्शन करणार आहेत. इंग्रजी विषयात न्यूझीलंड येथील ऑकलंड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील सांस्कृतिक व सामाजिक विभागातील प्राध्यापिका जोआना पास्को तर हिंदी विषयात राजस्थान येथील डॉ. कुसुम मेगवाल प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे हे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.
सदर परिषदेकरिता विविध देश विदेशातील विद्यार्थी, संशोधकांकडून मराठी हिंदी आणि इंग्रजी विषयातील विद्याशाखांमधून विविध विषयांतील शोधनिबंधांचे सादरीकरण केले जाणार असून सहभागी विद्यार्थी, संशोधक,प्राध्यापक यांनी सादर केलेले सर्व शोधनिबंध well reputed and pear reviewed multi disciplinary research journal with high impact factor स्वरूपाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केले जाणार असून या परिषदेमध्ये ” २१ व्या शतकातील साहित्य आणि सिनेमांमध्ये चित्रित स्त्री जीवन ” या विषयावरील विविध पैलू हाताळले जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक , प्राध्यापक याचबरोबर शैक्षणिक,सामाजिक, साहित्य क्षेत्रांतील मान्यवरांनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रो. (डॉ.) सादिक तांबोळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. अनिल वावरे यांनी केले आहे.



