Uncategorized

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जिल्ह्याचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व असलेले श्री.विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण येथील त्यांच्या निवासस्थानी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व असलेले श्री.विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या व आगामी काळात आवश्यक असलेल्या विविध विकासकामांबाबत सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून नेहमीच विकासाची दिशा मिळत राहो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी पाटण तालुक्याचे युवा नेते श्री.याज्ञसेन पाटणकर,सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती श्री.राजेश पवार फळ,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.मोहनराव पाटील, सातारा नगरपालिकेचे नगरसेवक ॲड.डी. जी.बनकर, श्री.विनीत पाटील, श्री.प्रितम कळसकर, श्री.सनी भोसले, श्री.रविराज पाटील, ॲड.कौस्तुभ मोरे, श्री.बाळासाहेब राजेमहाडिक, श्री. जवाहर पवार तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

#patan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button