कोणता पक्ष ठरणार भारी? तर कोण होणार सातारा शहराचा कारभारी?
नगरपालिकेचा निवडणुकीचा फैसला होणार उद्या, उत्सुकता पोहचली शिगेला!

19 दिवसाची प्रतीक्षा संपली उद्या सकाळ होणार उमेदवारांसाठी धावपळीची………
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर गेल्या १९ दिवसांपासून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मतमोजणी प्रक्रियेला उद्या, २१ तारखेला प्रारंभ होत आहे. शहरातील एमआयडीसी मधील शासकीय गोदामात असणारे उमेदवारांचे भवितव्यची मतमोजणी होणार असून, प्रशासनाने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे.
सकाळी १० वाजता मोजणीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते परंतु नगरपरिषदांच्या मतमोजणीची प्रक्रिया काही ठिकाणच्या निवडणुकीमुळे कोर्टाच्या आदेशाने पुढे गेली होती. यामुळे अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून सातारा नगरपालिकेच्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.



