Uncategorized

विना परवाना फ्लेक्स-होर्डिंगवर पोलिसांची कारवाईची चेतावणी

सातारा – सातारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणी पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याकडून महत्त्वाची नोटीस देण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रमास अनुसरून राज्यभरात दि. ०४ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू असून दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या अभिनंदनार्थ मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग, कटआऊट लावले जातात. अशा जाहिरातीमुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये ही नोटीस जारी केली आहे.

त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
विजयी उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते विना परवाना फ्लेक्स, बॅनर, कटआऊट, होर्डिंग लावल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि सदर नोटीस ही न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल.

पोलिसांनी शहरातील सर्व जाहिरात, फ्लेक्स व्यवसायिक तसेच राजकीय कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे सर्व्हिस दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button