Uncategorized

ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा सातारा पोलिसांचा उपक्रम

तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस वाहतुक करणारे ट्रक, ट्रैक्टर व ट्रॉली यांना रिफ्लेक्टर लावुन अपघात रोखण्यासाठी केली उपाययोजना.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व ट्रॉलींमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी सातारा तालुका पोलीस प्रशासनाने विशेष मोहिम राबविली.

आज अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे येथे पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस वाहतूकदारांना मार्गदर्शन करण्यात आले. ट्रक, ट्रॅक्टर व ट्रॉली यांना वाहतूक करताना अनिवार्यपणे रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या उपक्रमात अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. जिवनराव मोहिते, शेती अधिकारी विलासराव पाटील, कारखान्याचे कर्मचारी तसेच साखर वाहतूक करणारे ट्रॉली चालक व मालक यांची उपस्थिती होती.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यात पो. हवा. घोरपडे (ब.नं.६०२), घोरपडे (ब.नं.४४१), चव्हाण (ब.नं.१९७८), निकम (ब.नं.२२७१), जगताप (ब.नं.५०७), पो.कॉ. बगाडे (ब.नं.८९८) यांनी सहभाग घेतला.

मोहीमेत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button