Uncategorized

मतपेट्या सीलबंद करण्यावर सातारा नगरपरिषद अपक्ष उमेदवारांचा गंभीर आक्षेप

मतपेट्या सीलबंद करण्यावर सातारा नगरपरिषद अपक्ष उमेदवारांचा गंभीर आक्षेप; प्रांताधिकार्‍यांकडे तातडीने त्रुटी दूर करण्याची मागणी!

सातारा नगरपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांनी मतपेट्या ठेवलेल्या गोदामाला सील (Sealing) करण्याच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. काल रात्री मतपेट्या ठेवण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीमधील शासकीय गोदामाच्या सीलबंद प्रक्रियेत त्रुटी असल्याचा दावा करत, राम हादगे, प्रतिक भद्रे, संतोष इंदलकर, संजय पाटील आणि प्रशांत आहेरराव या अपक्ष उमेदवारांनी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री. आशिष बारकुलसाहेब यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

अपक्ष उमेदवारांनी नमूद केले आहे की, रात्री अपरिहार्य कारणामुळे ते गोदामाजवळ उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. शरद काटकर यांना पाठवले होते. त्यांच्या माहितीनुसार, गोदामाला सील करताना उमेदवारांच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत. तसेच, लावण्यात आलेले सील कधीही काढून परत लावता येऊ शकते आणि केवळ कुलूपच सीलबंद करण्यात आले आहे, असा गंभीर संशय उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

‘राज्यात काहीही घडू शकते’ अशी भीती व्यक्त करत, या अपक्ष उमेदवारांनी मागणी केली आहे की, गोदामाच्या मुख्य दरवाज्यावर मध्यभागी मतमोजणीपर्यंत टिकेल अशा पद्धतीने सील करावे आणि त्या सीलवर त्यांच्या सह्या घेण्यात याव्यात. तसेच, त्यांच्या सह्यांचे सील गोदामाला करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी प्रांताधिकार्‍यांना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button