Uncategorized

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड सातारा.

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड सातारा— राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सातारा

जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून ही जागा रिक्त होती. माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नव्या प्रमुखाची निवड अपेक्षित होती.

जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून संघटनाला नवसंजीवनी देण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज होती. पाच वेळा आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार मंत्री म्हणून काम पाहिल्यामुळे बाळासाहेब पाटील यांना संघटन बांधणीचा मोठा अनुभव आहे.

हा अनुभव लक्षात घेऊन पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. रोहित पवार यांनी जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे.

नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, “बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामुळे सातारा जिल्ह्यातील पक्ष अधिक मजबूत होईल,” असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, माजी मंत्री व नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना खा. शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. रोहित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, महिला विभाग प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button