Uncategorized

सातारा जिल्ह्यात नगरपालीका व नगरपंचायतीसाठी शांततेत मतदान.

मतदार व यंत्रणांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून आभार व्यक्त.

सातारा जिल्ह्यात पाचगणी, सातारा, मलकापूर, म्हसवड, वाई, कराड, रहिमतपूर या नगरपरिषदा तर मेढा नगरपंचायत यासाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 ते सांय 5.30 या वेळेत झालेले मतदान पुढीलप्रमाणे.

सातारा- 58.54 टक्के, कराड- 69.91 टक्के, वाई – 72.98 टक्के, पाचगणी – 77.45 टक्के, रहिमतपूर- 81.20 टक्के, म्हसवड- 79.85 टक्के, मलकापूर- 68.05 टक्के, मेढा नगरपंचायत- 84.23 टक्के अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे आणि मतदारांचे आभार मानले.

सातारा नगरपरिषदेमध्ये पुरुष 73848 तर महिला 74426, अन्य 33 असे एकूण 148307 मतदार आहेत. त्यापैकी 44742 पुरुष, 42056 महिला 14 इतर अशा एकूण 86812 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कराड नगरपरिषदेमध्ये पुरुष 34831 तर महिला 34993, अन्य 12 असे एकूण 69836 मतदार आहेत. त्यापैकी 24808 पुरुष, 24012 महिला, 4 इतर अशा एकूण 48824 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

वाई नगरपरिषदेमध्ये पुरुष 15470 तर महिला 16292, अन्य 1 असे एकूण 31763 मतदार आहेत. त्यापैकी 11646 पुरुष, 11536 महिला अशा एकूण 23182 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पाचगणी नगरपरिषदेमध्ये पुरुष 4830 तर महिला 5371 असे एकूण 10201 मतदार आहेत. त्यापैकी 3812 पुरुष, 4089 महिला अशा एकूण 7901 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

रहिमतपूर नगरपरिषदेमध्ये पुरुष 7924 तर महिला 7846 असे एकूण 15770 मतदार आहेत. त्यापैकी 6536 पुरुष , 6270 महिला अशा एकूण 12806 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

म्हसवड नगरपरिषदेमध्ये पुरुष 11820 तर महिला 11537, अन्य 1 असे एकूण 23358 मतदार आहेत. त्यापैकी 9628 पुरुष, 9022 महिला 1 इतर अशा एकूण 18651 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मलकापूर नगरपरिषदेमध्ये पुरुष 12712 तर महिला 12457, अन्य 5 असे एकूण 25174 मतदार आहेत. त्यापैकी 8768 पुरुष, 8363 महिला, 1 इतर अशा एकूण 17132 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मेढा नगरपंचायतीमध्ये पुरुष 1936 तर महिला 2090, असे एकूण 4026 मतदार आहेत. त्यापैकी 1669 पुरुष, 1722 महिला अशा एकूण 3391 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button