Uncategorized

वर्षा व्हिला, पाचगणी सिंगर ता. महाबळेश्वर येथील बंगल्यावर विभत्स डान्सवर पाचगणी पोलीसांची कारवाई

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पवार यांची तत्काळ कारवाई.

पाचगणीजवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील एका बंगल्यावर गायिका आणि महिला वेटरच्या नावाखाली बारबालांना आणून संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करून नृत्य केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी ‘वर्षा व्हिला’ या बंगल्यावर छापा टाकून हॉटेल मालकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळावर एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी होणाऱ्या गैरप्रकारांवर कडक कारवाईचे निर्देश दिले होते. यानुसार पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून खिंगर येथील ‘वर्षा व्हिला’ नावाच्या बंगल्यात हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली.

सोमवारी ​मध्यरात्री हा छापा टाकण्यात आला असून, या घटनेत पुण्यातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी पथकासह सहायक फौजदार कैलासनाथ रसाळ, पोलिस हवालदार श्रीकांत कांबळे, पोलिस हवालदार विठ्ठल धायगुडे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल व्ही. यु. नेवसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रुती गोळे यांनी आज पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास ‘वर्षा व्हिला’ बंगल्यावर छापा टाकला.

पथकाने मुख्य हॉलमध्ये पाहणी केली असता हॉटेल मालकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेल्या सहा बारबाला सुमारे पाच ते सात जणांसमोर उभे राहून अश्लील हावभाव करत नृत्य करताना दिसल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आणि बंगल्याच्या मालकासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

या छाप्यात ​घटनास्थळावरून पोलिसांनी साऊंड सिस्टीम, लाइट सिस्टीम, मोबाईल, डीव्हीआर आणि एक कार असा एकूण १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button