पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत कारवाई
पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत कारवाई
फलटण येथील महिला डॉक्टर च्या आत्महत्या प्रकरणी निलंबित असलेल्या व त्या गुन्ह्यात अटक असलेल्या निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास पदास अशोभनीय अशा नैतिक अधःपतन व अशोभनीय अशी गोष्ट केल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी यांनी शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या पुण्यातील अटक आरोपी निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याने पोलिस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची वर्तणूक केली. पोलिस उपनिरीक्षक पदाला अशोभनीय ठरेल असे वर्तन केले. म्हणून त्यास पोलिस खात्यात पदावर ठेवणे हे सार्वजनिक व लोकहितार्थ दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेतून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून बडतर्फ केले आहे, असे प्रसिद्धी पत्रक पोलिस अधीक्षक सातारा यांनी काढले आहे.
गोपाळ बदनेवर बलात्काराचा आरोप
दरम्यान, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी रात्री फलटण येथील एका लॉजवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली सापडली, ज्यामध्ये तिच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. पीएसआय बदनेने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत 5 महिन्यांपासून छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर चार पानांची सुसाईड नोट देखील समोर आली असून, त्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या पीएवरही आरोप आहेत.
रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप.
दरम्यान, महिला डॉक्टरने आपल्या तक्रारीत वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचे नमूद केले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी माजी खासदाराचे सहाय्यक दबाव टाकत असल्याचा उल्लेख तिने केला होता, मात्र पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. याच दबावामुळे तिने शेवटी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे. फलटणमधील अनेक घटना निंबाळकर आणि त्यांच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे घडत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी काही परावेही समोर आणले आहेत



