पाटण तालुक्यात जबरदस्तीने पैशाच्या आमिषाने किंवा चुकीच्या प्रलोभनाने होत असलेल्या धर्म परिवर्तनाच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर व संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासंदर्भात पाटण पोलीस स्टेशन डी.वाय.यस.पि ऑफिस यांना सकल हिंदू समाजाकडून निवेदन देण्यात आले. पाटण तालुक्यात अनेक वर्षापासून गावात काही व्यक्तीकडून हिंदू व बौद्ध समाजातील नागरिकांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्याचे तसेच धर्म परिवर्तन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात मल्हारपेठ पोलीस स्टेशन येथे काही महिलांनी लेखी तक्रार दाखल केलेली असून, त्या तक्रारीमध्ये विकास महादेव हादवे या व्यक्तीने महिलांना धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचे तसेच गैरवर्तन आणि धमकी दिल्याचे उल्लेख आहे. तक्रारीनुसार या व्यक्तीकडून काही महिलांच्या बदनामी सारख्या कृत्या बरोबर धर्म परिवर्तनासाठी प्रलोभन पैशांची देवाणघेवाण आणि मानसिक त्रास दिल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणा मागे काही मशिनरी संस्था किंवा इतर व्यक्तींचा आर्थिक व सामाजिक सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यक्तीचे सखोल चौकशी करून त्याचा मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर )तपासण्यात यावा. धर्म परिवर्तनासाठी कोणते आर्थिक व्यवहार झाले आहेत. का?हे शोधण्यासाठी त्यांचे बँक व्यवहार आणि मोबाईल ट्रांजेक्शन ची चौकशी करण्यात यावी. संबंधित महिलांच्या तक्रारींचे त्वरित नोंद घेऊन त्यांना संरक्षण व न्याय देण्यात यावा. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आणि पोलिसांना या संदर्भात सतर्कतेचे आदेश देण्यात यावेत. अशा आशयाचे निवेदन व मागण्या सकल हिंदू समाजाकडून पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. हा मोर्चा झेंडा चौक येथून पायी जाऊन पोलीस स्टेशन पाटण या ठिकाणी निवेदन देण्यात आले.
आमचा पाटण तालुका हा ग्रामीण भाग असून, याचा फायदा घेऊन साखळी पद्धतीने एकाने सावज शोधायचे दुसऱ्याने धर्म परिवर्तन करायचे आणि तिसऱ्याने पैशाच्या आमिष दाखवायचे अशा साखळी पद्धतीने अनेक गावात धर्म परिवर्तन केलेले आहे. अनेक गावात अकरा कुटुंब, सात कुटुंब, पाच कुटुंब या पद्धतीने धर्म बदलण्यात आलेला आहे. फक्त आडनाव तेच ठेवले आहे, आणि धर्म बदलण्यात आलेला आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे. सकल हिंदू समाजाकडून निषेध व्यक्त करन्यात आला.