Uncategorized

डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी नेमलीच नाही!: फक्त तपासावरील देखरेखीसाठी IPS सातपुतेंची नियुक्ती,

अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल....

डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी नेमलीच नाही!: फक्त तपासावरील देखरेखीसाठी IPS

सातपुतेंची नियुक्ती, अंधारेंचा सरकारवर हल्लाबोलĪअंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचे म्हटले जात होते. मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना फलटण न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात वरीष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉक्टरचे कुटुंब आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, सरकारने ,एसआयटीची स्थापना न करता आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची केवळ देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे.पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले पत्र जशास तसे…

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीबाबत.

उपरोक्त विषयी सातारा जिल्हयात डॉ. संपदा मुंडे यांनी दिनांक २३/१०/२०२५ रोजी आत्महत्या केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाणे गुरनं ३४५/२०२५ भा.न्या.सं. कलम ६४ (२) (m), १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस उप निरीक्षक आरोपी असून सदर प्रकरण अतिशय संवेदनशील बनलेले आहे. तरी सदर प्रकरणाचे तपासावर योग्य पध्दतीने देखरेख होणे गरजेचे असल्याने श्रीमती तेजस्वी सातपुते, समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.०१, पुणे यांना या गुन्हयाचे तपासावर देखरेख करणेसाठी या आदेशाव्दारे नियुक्ती करण्यात येत आहे. श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी तात्काळ सातारा येथे जावून सदर गुन्हयाबाबत पोलीस अधीक्षक, सातारा व तपासी अधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घ्यावी तसेच गुन्हयाचा पुढील तपास योग्य पध्दतीने व कालमर्यादेत होईल हे सुनिश्चित करावे. त्याचबरोबर गुन्हयाच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करावा, असे पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button