पाटण मतदारसंघातील सुज्ञ जनतेने आता तरी…उघडा डोळे…बघा नीट.
पाटण मतदारसंघातील सुज्ञ जनतेने आता तरी...उघडा डोळे... बघा नीट....
सह्याद्रीच्या कुशीतला पाटण तालुका —
मेहनती शेतकऱ्यांचा, मातीशी बांधिलकी असणाऱ्या माणसांचा तालुका.
हीच ती माती जिथे प्रत्येक शेतकरी घामाने इतिहास लिहितो…
पण आज हीच माती तहानली आहे.
त्या काळी, १९९९ ते २००० दरम्यान,
तत्कालीन जलसंपदा मंत्री मा. अजितदादा पवार आणि मा. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली
निवकणे, चिटेघर आणि बीबी या तिन्ही मध्यम धरण प्रकल्पांची कामं सुरु झाली.
त्या वेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत स्वप्न होतं –
“आता आपल्या बांधावर पाणी येणार, शेती फुलणार, आयुष्य बदलेल!”
२०१४ पर्यंत कामं तब्बल ८० टक्के पूर्ण झाली होती.
पण त्यानंतर सत्तेचा रंग बदलला…
आणि या प्रकल्पांवर राजकीय आकसाचं काळं ढग दाटलं!
मा. शंभूराज देसाई हे तेव्हापासून आजपर्यंत
मंत्रीपद भोगत आहेत, आज ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत.
पण एवढ्या वर्षांत —
ना विधानसभेत आवाज, ना निधीची मागणी, ना शेतकऱ्यांसाठी ठोस पाऊल.
ज्यांनी जमीन गमावली, घरं उध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाले —
त्यांच्यासाठी एक शब्दही नाही!
चार वर्षांपूर्वी साखरी गावात मोठ्या सभेत शंभूराज देसाईंनी गर्जना केली होती —
“मी ही तिन्ही धरणं पूर्ण करणार, बांधावर पाणी आणणार!”
पण चार वर्षं उलटली…
धरण तिथंच, अर्धवट;
आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अजूनही फक्त कोरडेपणा आणि फसवणुकीचा राग!
३१ ऑक्टोबर रोजी केरळ गावात पुन्हा एक नवीन तमाशा उभा झाला —
पालकमंत्र्यांनी “ड्रोन सर्वेक्षण” कामाचा शुभारंभ केल्याचं जाहीर केलं,
आणि दावा केला की “१०० मीटर उंचीवरून पाणी उचलून देणार!”
या कामाला ना शासनाची मान्यता, ना प्रशासकीय मंजुरी
फक्त निवडणूक जवळ आली की आश्वासनांचा पाऊस!
हे जनतेच्या भावनांवरचं राजकारण आहे,
ही लोकांची थट्टा आहे, शेतकऱ्यांची फसवणूक आहे!
दरम्यान, निवकणे धरणाचं काम अजूनही ठप्प —
घळभरणी नाही, साठा नाही, फक्त गाळ आणि दुर्लक्ष.
आणि दुसरीकडे, या पाण्यावर आता अदाणी समूहाचा “ग्रीन हायड्रो” प्रकल्प सुरू झाल्याचं वृत्त.
मग विचारायलाच हवं —
हे धरण शेतकऱ्यांचं की उद्योजकांचं?
या पाण्यावर पाटण तालुक्याच्या शेतकऱ्यांचा हक्क कुठं गेला?
आणि पालकमंत्री गप्प का आहेत?
मा. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या धरणांसाठी अथक प्रयत्न केले.
निवकणे धरणाची उंची वाढवून,
दोन्ही बाजूंनी ग्रॅव्हिटीने शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम सुरू केलं.
पण सत्ताधाऱ्यांनी अडथळे आणले — आणि कामं बंद पाडली!
आज या तिन्ही धरणांची अवस्था दयनीय —
कामं थांबलेली, बांध सुकलेले, आणि शेतकऱ्यांच्या शेतीत नाही पण डोळ्यात पाणी.
पण आता पुरे झालं.
पाटण तालुक्याचा आवाज दाबला जाणार नाही.
ही केवळ धरणाची लढाई नाही —
ही आहे शेतकऱ्याच्या सन्मानाची आणि हक्काची लढाई.
ज्यांनी विकासाच्या नावाखाली अडथळे आणले,
त्यांना जनतेसमोर उत्तर द्यावंच लागेल.
-
अहो साहेब…. नो उल्लू बनायींग.




