दरे खुर्द येथे बांधकामाच्या जिन्यावरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू.
संजु प्रतापसिंग यांचा दुर्दैवी अंत; नातेवाईकांचा शोध,मेढा पोलिसांचे आवाहन.

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार
दरे खुर्द,ता.जावळी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जिन्यावरून पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दि.३० सप्टेंबर रोजी घडली.
संजु प्रतापसिंग (वय ५०, रा. गोविंदपुरा,जिल्हा रांची,राज्य झारखंड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्यापूर्वी दरे खुर्द गावच्या हद्दीत सागर बुबासो पवार यांच्या परावर सुरू असलेल्या बांधकामाच्या जिन्यावरून संजु प्रतापसिंग हे खाली पडले.या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून,पुढील तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.
दरम्यान,मृत संजु प्रतापसिंग यांना सध्या कोणतेही नातेवाईक अथवा वारस आढळून आलेले नसून ते बेवारस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.त्यांच्या नातेवाईकांचा किंवा वारसांचा शोध घेण्यासाठी मेढा पोलिसांनी आवाहन केले आहे.
मृत व्यक्तीचे नातेवाईक किंवा वारस असल्यास त्यांनी मेढा पोलिस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील (मो. ८३०८८३०७५६),पोलीस हवालदार यादव (मो. ८९९९२३१२९२) किंवा पोलीस हवालदार प्रमोद निकम (मो.८६६७२५९९८९) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.



