गांधी जयंतीदिनी संगम माऊली येथे स्वच्छता अभियान; महिला व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी मोहन खुडे
गांधी जयंतीचे औचित्य साधून रयत रस्ते सेवा संघ, श्री शक्ती ग्रुप आणि अश्वदीप सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (२ ऑक्टोबर) भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. हे अभियान संगम माऊली परिसर येथे पार पडणार आहे.
‘हातात हात घ्या बंधूंनो, साथ द्या… स्वच्छ भारत, सुंदर भारत’ असा संदेश देत परिसराची स्वच्छता करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचा संदेश देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्वच्छता अभियानासाठी सर्व महिला, सामाजिक कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत संगम माऊली येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वनिताताई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहिमेत निर्मला काटकर, सुरेखा धोत्रे, रोहिणी कदम, उज्वला सुतार, राजश्री देशमुख, ममता शेलार, रेखा खिलारी, सविता सावंत, नीलम जगदाळे, राजश्री जाधव, सुजाता सुतार, वैष्णवी पुजारी, मीना जगदाळे, वैष्णवी लोखंडे, पल्लवी निकम, आसावरी काटकर, शुभांगी क्षीरसागर यांच्यासह सर्व सामाजिक कार्यकर्त्या, पदाधिकारी व महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
परिसरातील जास्तीत जास्त महिला व नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.



