Uncategorized

मनोरंजनातून प्रबोधनाचा ‘भयकंप’; पाटखळच्या नवरात्र शिवाजी उदय मंडळाचा अनोखा देखावा!

​या... पाहा... अनुभव घ्या! पाटखळमध्ये रंगणार 'जिवंत भुतांचा' प्रबोधनात्मक देखावा.

पाटखळ येथे नवरात्र शिवाजी उदय मंडळाचा भव्य जिवंत भुतांचा देखावा

पाटखळ : गणेशोत्सवानिमित्त नवरात्र शिवाजी उदय मंडळ, भवानी चौक, पाटखळ यांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून भव्य-दिव्य जिवंत भुतांचा देखावा सादर करण्यात येत आहे. यंदाही मंडळाच्या सभासदांनी एकत्रितपणे या आगळ्या-वेगळ्या देखाव्याची तयारी केली आहे.

या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मनोरंजनावर भर न देता भुतांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंडळातील सर्व सभासद एकजुटीने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा जिवंत भुतांचा देखावा गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, परिसरातील नागरिक व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या उपक्रमाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन नवरात्र शिवाजी उदय मंडळ, पाटखळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“या… पाहा… अनुभव घ्या… आणि सामाजिक संदेश घेऊन जा!” असा संदेश मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

स्थळ : भवानी चौक, पाटखळ
आयोजक : नवरात्र शिवाजी उदय मंडळ, पाटखळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button