भंगारवाल्यांची ‘कुंडली’ बाहेर येणार? बनावट आधार, पॅन कार्ड देणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा; जावलीत संतापाचा उद्रेक!
१० दिवसांचा अल्टीमेटम! ग्रामपंचायतीचा हातोडा पडणार की भंगार माफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धंदा चालवणार?

भंगार व्यवसाय घोटाळा भाग 6
कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार.
कुडाळ पंचक्रोशीसह जावली तालुक्यामध्ये अनेक भंगार व्यवसायिकांचा पसारा वाढतच चालला आहे.अनाधिकृतपणे परप्रांतीय कि बांगलादेशी हे जावली तालुक्यामध्ये भंगार व्यवसाय करत असून यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा जीएसटी महसूल दररोज बुडत आहे.
तसेच काही भंगार व्यवसायिक स्थानिकांना हाताशी धरून चोरीमारीचे साहित्य घेऊन गच्चम कमाई करू लागले आहेत.तसेच आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या साहित्यांची चोरी करून आपल्यातल्या शेतकऱ्यांना मानसिक,आर्थिक त्रास देत काही स्थानिकांना आर्थिक मोबदला देत त्यामध्ये पापाचे भागीदार म्हणून सहभागी करून परप्रांतीय भंगार व्यावसायिक व्यवसाय करत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.मात्र ही मंडळी मुळची कुठून आली याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.तसेच कुडाळसह तालुक्यातील काही भंगार व्यवसायिक बांगलादेशी की परप्रांतीय याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
तसेच त्यांना आधारकार्ड,पॅनकार्ड, रेशनकार्ड,रहिवासी प्रमाणपत्र कोणत्या नियमाला धरून कोणत्या संबंधित ग्रामपंचायत आणि ग्राम विकास अधिकारी यांनी कोणत्या काळात दिली या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक रहिवासी,शेतकरी करू लागले आहेत.
त्यामुळे आता जीएसटी बुडव्या भंगार वाल्यांची कुंडली बाहेर काढण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनासमोर असणार आहे.
तसेच दि.9/9/ 2026 रोजी कुडाळ परिसरात विना परवाना करत असणाऱ्या काही भंगार व्यवसायिकांना कुडाळ ग्रामपंचायतीने व्यवसाय करण्यासाठी आणि शासकीय नियमानुसार आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र,परवानगी बाबत लेखी पत्र दिले असून पुढील १० दिवसात येणे प्लॉटमध्ये विनापरवाना सुरू असणारे भंगार व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुडाळ ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी भंगार व्यवसायिकाकडून केली जाते की नाही? का या उलट स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिचून भंगार व्यवसाय सुरूच ठेवला जातो याकडे संपूर्ण कुडाळ पंचक्रोशीसह तालुक्यातील स्थानिक शेतकरी, रहिवासी,दररोज ये-जा करणारे शेकडो वाहनधारक यांचे लक्ष लागून राहिले आहे.



