Uncategorized

कळंबे गावचे सुपुत्र ज्येष्ठ शिक्षक अनिल जायकर यांचा सेवापूर्ती सत्कार संपन्न.

प्रतिनिधी:- श्रीकांत गोळे.

शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि समर्पित सेवेबद्दल कळंबे (तालुका सातारा) येथील सुपुत्र तथा ज्येष्ठ शिक्षक मा. श्री. अनिल जायकर सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याप्रसंगी सातारा पंचायत समितीचे सभापती पैलवान महेशदादा गाडे यांनी नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत उपस्थित राहून जायकर सरांचा सत्कार केला व त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

जायकर सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या निष्ठावंत आणि उल्लेखनीय सेवेबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

“शिक्षकाने आपल्या सेवेच्या माध्यमातून समाजाची आणि भावी पिढीची मोठी घडण केलेली असते. जायकर सरांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान कौतुकास्पद असून, त्यांना पुढील सुखी, निरोगी व आनंदी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा,” अशा भावना याप्रसंगी पैलवान महेशदादा गाडे यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि ग्रामस्थ-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button