वारकऱ्यांची सेवा ही रुग्णसेवा :संपर्क प्रमुख निलेश मोरे
लोणंद : वारकऱ्यांना खाऊ वाटप करताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी.

सातारा : प्रतिनिधी
“वारकऱ्यांची सेवा ही केवळ समाजसेवा नसून रुग्णसेवाच आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यास कटिबद्ध आहे. पालखी मार्गावरील वैद्यकीय सेवा, अन्नदान आणि आवश्यक साहित्य वितरणाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाच्या कार्यात हातभार लावत आहोत. हजारो वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची बाब आहे,” असे प्रतिपादन सातारा जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख निलेश मोरे यांनी केले.
आषाढी वारीनिमित्त पालखीचा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्काम असल्याने लोणंद येथे दि. १५ रोजी मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे स्वयंसेवक तळ ठोकून कार्यरत होते. यावेळी वारकरी बांधवांना १५ हजार केळी, १० हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच १० हजार चिवडा पॅकेटचे वाटप करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय मदत आणि प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी जितेंद्र जाधव, दीपक चव्हाण, प्रतीक काळे, गौरव राक्षे गणेश पवार, गणेश दनाने, प्रज्योत शेळके, लक्ष्मण जाधव, जमीर शेख, अक्षय चव्हाण, विवेक चव्हाण, किरण गायकवाड, विशाल आबानावे, सूरज डोईफोडे, विशाल शिखरे, हर्षल पवार, यश चव्हाण, पंकज माने,शुभम मोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.



