Uncategorized

फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना;विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू.

फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना. विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चारही जणांचा मृत्यू.

दिनांक ८/७/२०२६ रोजी पहाटे ०५.३० वाजण्याच्या सुमारास खामगाव ता.फलटण जि.सातारा गावचे हद्दीत एका कुटुंबातील मुलगा १) सचिन सतीश शिंदे वय २६ वर्षे रा खामगाव ता फलटण जि सातारा यांना त्यांचे घराचे वरून जाणारे केवळ वायरला सपोर्ट लावलेली बायडिंग वायर ही एमएसईबी च्या अंडर कोटिंग वायरला घासून एमएसईबीच्या वायरला कट पडून ती वायर ताण दिलेल्या लोखंडी तर त्याच्या हातात होती व ते ओरडत असताना त्यांचे वडील २) सतीश उर्फ पिसुराड्या किसन शिंदे वय ४५ वर्षे, आई ३) गंगू सतीश शिंदे वय 40 वर्षे, हे त्यास सोडवण्यास गेले त्यावेळी त्यांना देखील लोखंडी तारेचा शॉक लागला म्हणून फिर्यादी शीतल सचिन शिंदे यांनी लोखंडी तार न पकडता हातात काठी घेऊन ताण दिलेली लोखंडी तर सोडवीत होत्या त्यावेळी बहीन ४) आरती सतीश शिंदे वय 24 वर्षे ही तिचे आई वडील भाऊ यानंतर दिलेल्या लोखंडी तारेचा शॉक लागल्याचे पाहून तेथे आली, तिने काही एक न पाहता लोखंडी तार हाताने पकडल्याने तिला देखील शॉक बसला. त्यावेळी फिर्यादी शीतल (मयत सचिन शिंदे याची पत्नी) हिने हातातील काठीने सर्वांना बाजूला केले परंतु ते बेशुद्ध होऊन खाली पडल्याने एकाच कुटुंबातील वडील, आई, मुलगा, मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत शितल सचिन शिंदे यांनी दिले खबरीवरून फलटण ग्रामीण अकस्मात मयत रजि नंबर ७५/२०२६, ७६/२०२६,७७/२०२६, ७८/२०२६ BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आलेली आहे.

नमूद घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्री धन्यकुमार गोडसे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ फलटण शहर पोलीस ठाणे तसेच पुरेसे मनुष्यबळ तात्काळ घटनास्थळी रवाना केले.

तसेच नमूद घटनास्थळी श्री निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी भेट दिली. घटनास्थळावर असणारे अधिकारी यांना नमूद चारही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे शवविच्छेदनाकारीता घेऊन जाण्याच्या सुचना दिल्या तसेच शवविच्छेदन झाल्यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यांचा रूढी परंपरे प्रमाणे अंत्यविधी करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने मयतांच्या नातेवाईकांना तत्पर मदत करून त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता मयताच्या नातेवाईकांना मदत करून अंत्यविधी करण्यात आला. तसेच मयतेचा पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक शिवानी नागवडे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Ai imges

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button