Uncategorized

कास रस्त्यावरील सांबरवाडी येथील नाकाबंदीत सराईत गुन्हेगार जाळ्यात; देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

कास रस्त्यावरील सांबरवाडी येथील नाकाबंदीत सराईत गुन्हेगार जाळ्यात; देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दित आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने धबधबे, घाट माथा परिसर, नदी काठची गावे इत्यादी ठिकाणी पर्यटकांची व हुल्लडबाज मुलांची वर्दळ वाढलेने अनुचित प्रकार होऊन जिवितहानी होऊ नये याकरीता नाकाबंदी व मोटर वाहन कायदयान्वये कारवाई करणेकरीता सांबरवाडी ता.जि. सातारा येथे पोलीस अंमलदार नेमणेत आलेले होते. त्याप्रमाणे दि.०७/०७/२०२६ रोजी सांबरवाडी ता.जि. सातारा येथे नाकाबंदी व मोटर वाहन कायदयान्वये कारवाई करीत असताना सायंकाळी १६.५० वा.चे सुमारास एक इसम तोंडाला मास्क लावुन त्याचे ताब्यातील मोटर सायकल क्रं. एम.एच. ११/ ईबी १२३९ वरुन कास बाजुकडे जात असताना त्यास पोलीसांनी हाताने इशारा करुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो नाकाबंदी करीता असलेले पो.उ.नि. श्री. शिंदे, पो.हवा. चव्हाण ब.नं. १९७८, पो.हवा. घोरपडे ब.नं. ४४१ व पो.हवा. निकम ब.नं. २२७१ यांना चकवा देवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नाकाबंदी करीता असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यास पकडुन त्याचेकडे त्याचे नाव पत्ता व त्याचे लायसन्स व मोटर सायकलेचे कागदपत्रांबाबत विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता सांगण्यास, लायसन्स दाखविण्यास व मोटर सायकलची कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळी त्यास पोलीसांनी त्याचे ताब्यातील मोपेड मोटर सायकलची डिकीमध्ये काय आहे

असे विचारले असता तो त्याबाबत काही एक माहिती देत नसल्याने पोलीसांनी शंका आली म्हणुन पोलीसांनी लागलीच दोन पंचांना बोलाऊन घेऊन सदर इसमाचे ताब्यातील होन्डा अॅक्टीव्हा मोटर सायकल क्र. एम.एच. १२/ ई बी १२३९ ची झडती घेतली असता सदर मोटर सायकलचे डिकीमध्ये एक सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस, मोटर सायकल व दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १,९६,०००/- रुपये साहीत्य मिळुन आले आहे.

त्यावेळी सदरचा इसम हा रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आले असुन त्यास पोलीसांनी त्याचे कब्जात बिगर परवाना देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस, मोटर सायकल व मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १,९६,०००/- रु.चे साहीत्य बाळगले स्थितीत मिळुन आलेने त्याचे विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक श्री. सोनु शिंदे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, साो सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. अपर पोलीस अधिक्षक, साो सातारा व श्री. विपुल पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो सातारा शहर विभाग, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. निलेश तांबे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे यांचे सुचने प्रमाणे करण्यात आली असुन सदर कारवाईमध्ये सातारा तालुका पोलीस ठाणेकडील सपोनि श्री. सुदर्शन काटकर, सपोनि श्री. मुजावर, सपोनि श्री. चंद्रहार पाटील, पोउपनि अभिजीत गुरव, पोलीस उप निरीक्षक सोनु शिंदे, पो. हवा. मालोजी चव्हाण, रायसिंग घोरपडे, अजित निकम यांनी सहभाग घेतला आहे.

प्रति,

सर्व वृत्त संपादक सातारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button