Uncategorized

भरतगाव येथील अपघातातील जखमीला शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने दिले जीवदान.

भरतगाव येथे दुचाकीला अपघात; पाटण तालुक्यातील जगन्नाथ सपकाळ नावाचे गृहस्थ जखमी, रुग्णालयात दाखल.

भरतगाव: सातारा जवळील भरतगाव येथे एका दुचाकीचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात पाटण तालुक्यातील रहिवासी असलेले जगन्नाथ मारुती सपकाळ हे जखमी झाले आहेत.

​अपघाताची माहिती मिळताच ‘शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम’ने नेहमीप्रमाणे अत्यंत तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मोठ्या योगदानासह जखमी जगन्नाथ सपकाळ यांना तात्काळ प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

रेस्क्यू टीमच्या या वेळेत मिळालेल्या मदतीमुळे जखमीला पुढील उपचार मिळणे सोपे झाले असून, स्थानिक नागरिकांकडून टीमच्या या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.

फोटो संग्रहित….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button