Uncategorized

वाढदिवशीच अपघात, पण कर्तव्य विसरले नाहीत; पीआय सूर्यवंशी यांनी दाखविली संवेदनशीलता.

अपघाताच्या संकटातही पोलीस निरीक्षकाची माणुसकी; स्वतः जखमी असतानाही धावले मदतीला!वाढदिवशीच अपघात, पण कर्तव्य विसरले नाहीत; पीआय सूर्यवंशी यांनी दाखविली संवेदनशीलत

अपघाताच्या क्षणीही जपली माणुसकी; पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी जखमीला तत्काळ उपचारासाठी पाठवले

पाटणकडे जात असताना बेलदरे फाटा परिसरात झालेल्या अपघातात पाटण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या वाहनाची चार ते पाच वाहनांना धडक झाली. या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अपघातानंतर स्वतः किरकोळ जखमी असतानाही सूर्यवंशी यांनी दाखविलेल्या माणुसकीची परिसरात चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे कर्तव्यावर पाटणकडे जात होते. त्यावेळी बेलदरे फाटा परिसरात एक दुचाकीस्वार अचानक त्यांच्या वाहनासमोर आल्याने अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात सूर्यवंशी यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाखाली उभ्या असलेल्या तीन दुचाकींना धडकून पुढे झाडावर आदळले.

या अपघातात समोरून आलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांची गर्दी होऊ लागली. अशा परिस्थितीत अनेक जण घटनास्थळ सोडून निघून जातात; मात्र सूर्यवंशी यांनी तसे न करता जखमीच्या मदतीला धाव घेतली. स्वतः किरकोळ जखमी असूनही त्यांनी जखमीला तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले.

योगायोगाने त्याचवेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) वाहन तेथून जात होते. सूर्यवंशी यांनी तत्काळ समन्वय साधून जखमी व्यक्तीला त्या वाहनातून कराड येथे उपचारासाठी रवाना केले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जखमीला मदत करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि उपचारासाठी वेळ न दवडता व्यवस्था केली.

बेलदरे फाटा हा अपघातप्रवण परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे या धोकादायक वळणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

विशेष म्हणजे हा अपघात पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या वाढदिवशीच घडला. अपघाताची घटना दुर्दैवी असली तरी संकटाच्या क्षणी त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि माणुसकीची भूमिका नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button