Uncategorized

वाहनधारकांना दिलासा, अतिक्रमकांचा थरकाप! समर्थ मंदिर रस्त्यावर पालिकेची मोठी कारवाई

अतिक्रमणमुक्त समर्थ मंदिर रस्ता! सातारा पालिकेच्या धडक कारवाईनंतर वाहनधारकांकडून आभार.

सातारा : शहरातील समर्थ मंदिर परिसरात सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे परिसरात एकच धुरळा उडाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पालिकेकडून यापूर्वी संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने अखेर पालिकेने थेट कारवाईचा निर्णय घेतला. काही मिळकतधारकांकडून “आमचे आम्ही काढून घेतो” असे सांगत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही पालिकेने नियोजनाप्रमाणे मोहीम सुरू ठेवली.

या मोहिमेत अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शहर विकास विभाग तसेच विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि वाहतूक शाखेचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कारवाईदरम्यान इक्बाल बागवान यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.
दुपारपर्यंत रुंदीकरण मोहीम धडाक्यात सुरू होती. या कारवाईत सुमारे ३० मिळकतधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button