Uncategorized

कराड शहर पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार.

कराड शहर पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार...

कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही संबंधितांकडून गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याने प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवसागर ऊर्फ डोक्या संजय नलवडे (वय ३०, रा. मलकापूर, ता. कराड) व ऋषिकेश अविनाश सावंत (वय २८, रा. बुधवार पेठ, कराड) यांचा समावेश आहे. दोघांवर विविध गुन्ह्यांची नोंद असून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

पोलीस प्रशासन व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवल्यामुळे कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. दराडे यांनी प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय दंडाधिकारी अतुल मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांच्या अभिलेख पडताळणीचे काम सुरू असून, भविष्यातही अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. दराडे यांनी दिला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम व पोलीस अंमलदार पो.हवा 11 पाटील, पो.हवा. 1223 कुभार, पो.ना 1728 जगताप, पो.ना.स्वामी 2204, धीरज कोरडे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, निलेश विभुते यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button