Uncategorized

शिवेंद्रसिंहराजे कडाडले! नगरसेवकांच्या कारभारावरून थेट कडक शब्दांत तंबी

सातारा नगरपालिकेत नगर विकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी असे काही नाही सगळे भाजपचेच नगरसेवक आहेत.

सातारा नगरपालिकेत नगर विकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी असे काही नाही सगळे भाजपचेच नगरसेवक आहेत.कोणीही गटबाजी करून कुरघोड्याचे राजकारण केलं तर माझ्याशी गाठ आहे. पुढच्या वेळेस कोण कसा निवडून येतो ते पण मी बघतो आणि सातारा पालिकेत परवा दिवशी सभेत झालेला प्रकार चुकीचा आहे. असले प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाही असा कडक निर्वाणीचा इशारा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरसेवक, पदाधिकारी यांना दिला.

सातारा नगरपालिकेत परवा दिवशी सर्वसाधारण सभेत झालेल्या राड्यामुळे सातारा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.भाजपची सत्ता असलेल्या सातारा नगरपालिकेत कुरघोड्या आणि गटबाजीला उधाण आल्याने त्या अनुषंगाने आज मंत्री शिवेंद्रसिहराजे यांनी सातारा नगरपालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवक,नगरसेविकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवकांना कानपिचक्या देत. शहरातील विकास कामांवर भर देण्यात सभागृहात वेळ घालवावा अशा सूचनाही दिल्या.

तसेच सातारा नगरपालिकेतील टेंडरगिरीवरही शिवेंद्रसिंहराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली. नगरपालिकेतील टेंडर कार्यकर्ते आणि बगलबच्चांना जपण्यासाठी दिली नाहीत. जुनी सर्व टेंडर रद्द करून प्रोफेशनल कंपन्यांनाच टेंडर देण्यात यावे. लोकांना आता कामे पाहिजेत चांगली कामे शहरात झाली पाहिजे. स्वच्छता पाणी सर्व गोष्टी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे असा कडक सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत.

खासदार उदयनराजे यांच्याबरोबर लवकरच बैठक: मंत्री शिवेंद्रसिंहराजे सातारा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नवीन येणाऱ्या प्रोजेक्ट संदर्भात लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्या बरोबर बैठक घेणार असून त्यात अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button