आरोग्य

सातारा सिव्हिलमध्ये बालकांसाठी उद्या होणार मोफत शिबिर.

सिव्हिलमध्ये बालकांसाठी उद्या मोफत शिबिर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील लहान मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे. शुक्रवार दि. १ मे रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिली गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना मेडिकल हेल्प सेलच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. आतापर्यंत १० हजारहून अधिक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यंदाचे हे शिबिर विशेषतः हृदयविकार असलेल्या बालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत लहान मुलांची मोफत २ डी इको (हृदय तपासणी) केली जाणार आहे. तपासणीत शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची पुढील शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे मोफत करण्यात येणार आहे. हे शिबिर डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आहे.अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button