Uncategorized

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उपक्रम.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील लहान मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील लहान मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवार, १ मे रोजी जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), सातारा येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना मेडिकल हेल्प सेल यांच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जात असून, आतापर्यंत १०,००० हून अधिक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यंदाचे हे शिबिर विशेषतः हृदयविकार असलेल्या बालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे

या उपक्रमांतर्गत लहान मुलांची मोफत २डी इको (हृदय तपासणी) केली जाणार आहे. तपासणीत शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची पुढील शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.

हे भव्य शिबिर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर डॉ. आशुतोष सिंह आणि डॉ. पूजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. राहुल जाधव यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे. तसेच या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रामहरी राऊत, निलेश मोरे, प्रविण पाटील, धीरज गांधी, अनिल मोरे, दीपक चव्हाण, अक्षय बामणे, सोमनाथ भंडारी, रणजीत साबळे, किरण सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.

गरजू पालकांनी आपल्या बालकांची तपासणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने सचिव गणपती कांबळे, जिल्हा कक्ष प्रमुख रितेश ननावरे, जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शिवराज चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button