Uncategorizedमहाराष्ट्र

पालीत गव्हाच्या शेतात नशेच आंतरपीक.

पालीत सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; 51 किलो गांजा जप्त, नामदेव माने अटकेत

 

सातारा तालुक्यात नशिल्या शेतीचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाली (ता. जि. सातारा) येथील गट क्रमांक 23 मधील गव्हाच्या शेतात अंतरपिक म्हणून गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याचे आढळून आले असून सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज कारवाईत व्यापारी प्रमाणातील तब्बल 51 किलो 275 ग्रॅम वजनाचा, सुमारे 12 लाख 81 हजार 275 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नामदेव लक्ष्मण माने (वय 42, रा. पाली, ता. जि. सातारा) यास अटक करण्यात आली आहे.

सातारा तालुका पोलीस ठाण्यातील सफौ. धनाजी वायदंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाईचे नियोजन करण्यात आले. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग, श्री राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी फॉरेन्सिक पथक, शासकीय पंच व वजनमापक यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करून पाली गावात छापा टाकला.

छाप्यादरम्यान सुमारे 30 गुंठे क्षेत्रातील गव्हाच्या पिकात गांजाची लागवड आढळून आली. पंचनामा करून सदर गांजाची फॉरेन्सिक तपासणी व वजन करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करीत आहेत.

ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि. विनोद नेवसे, सपोनि. सुदर्शन काटकर, सफौ. धनाजी वायदंडे, पो. हवा. मनोज गायकवाड, पो.हवा. राजू शिखरे, पो.हवा. पंकज ढाणे, पो.हवा. दादा स्वामी, पो.हवा. सतीश बाबर, पो. हवा. प्रदीप मोहिते, पो.हवा. मालोजी चव्हाण, पो.हवा. किरण जगताप, पो.कॉ. संदीप पांडव, पो.कॉ. सुनिल भोसले, पो.कॉ. सचिन झनकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली. तसेच फॉरेन्सिक पथकातील सपोनि. रुपाली मोरे, पो.हवा. मोहन नाचण, पो.हवा. प्रशांत ताटे, पो.हवा. मारुती अडागळे, पो.कॉ. अमोल निकम यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button