मोबाईलचा वाद शहर पोलीस ठाण्यात निलेश मोरे यांची मध्यस्थी स्थानिकांना मिळाला न्याय
मोबाईलचा वाद शहर पोलीस ठाण्यात निलेश मोरे यांची मध्यस्थी स्थानिकांना मिळाला न्याय

सातारा शहर व परिसरात मोबाईलचे पार्ट होलसेल दरात विक्री करणारे परप्रांतीय आणि स्थानिक भुमिपुत्र यांच्यात मंगळवारी रात्री वाद झाला. हा वाद सातारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला तर मोबाईल असोसिएशनचे निलेश मोरे यांच्या मदतीने हा वाद मिटवला गेला. पोलीस निरीक्षक यांनी भूमिपुत्र यांच्या बाजूने निर्णय देत परप्रांतीयांना समज दिला.
सातारा शहर व परिसरात मोजकेच मोबाईलचे पार्ट होलसेल दरात विक्री करणारे परप्रांतीय आहेत. हे लोक रिटेल दरातही मोबाईलचे पार्ट विक्री करत असल्याने स्थानिक मोबाईल व्यवसायिकांना अडचणी येत आहेत. त्यांचा व्यवसायाला फटका बसत आहे. याबाबत या परप्रांतीय व्यवसायिकांना स्थानिकांकडून सूचना व समज देण्यात आल्या. मात्र यावर त्यांनी दुर्लक्ष करत व्यवसाय सुरू ठेवला. मंगळवारी सायंकाळी याबाबत तक्रारी वाढू लागल्याने सातारा मोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी या परप्रांतीय व्यवसायिकांना धारेवर धरले. यावर तणाव निर्माण झाला. रात्री हे प्रकरण शहर पोलीस ठाण्या पर्यंत गेले. यावेळी असोसिएशनचे संस्थापक निलेश मोरे व शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी याबाबत चर्चा करून दोघांच्या बाजू समजून घेतल्या. त्यावर रिटेल व्यवसायिकांनी रिटेलच विक्री करावी अशा सूचना परप्रांतीय व्यावसायिक यांना देण्यात आले.
यानंतर पोलीस ठाण्यासमोरील तणाव शांत झाला. यावेळी सातारा मोबाईल असोसिएशन संस्थापक निलेश मोरे, अध्यक्ष सचिन साळुंखे, उपाध्यक्ष समीर शेख, खजिनदार आकाश जैन आदी व्यावसायिक उपस्थित होते.



