Uncategorized

“रक्षकच बनले भक्षक”: वडूज पोलिस ठाण्यात तक्रारदार सागर कदम यांना अमानुष मारहाण!

"रक्षकच बनले भक्षक": वडूज पोलिस ठाण्यात तक्रारदार सागर कदम यांना अमानुष मारहाण!

वडूज, महाराष्ट्र: ‘रक्षकच झाले भक्षक’ असा संतापजनक प्रकार वडूज पोलीस ठाण्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या वडूज एसटी स्टँडवरील कॅन्टीनमध्ये पडलेल्या दरोड्याची तक्रार घेऊन गेलेले तक्रारदार सागर मानसिंग कदम यांनाच वडूज पोलिसांकडून अमानुष मारहाणीचा सामना करावा लागला आहे.

सागर कदम हे त्यांच्या कॅन्टीनवरील दरोड्याची तक्रार पुराव्यासह देण्यासाठी वडूज पोलीस स्टेशन येथे गेले होते. मात्र, हवालदार कदम आणि हवालदार भोसले यांनी त्यांना दम देऊन बोलावले आणि ‘तुम्ही खोटी दरोड्याची तक्रार देत आहात’ असे सांगून त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला.

याचवेळी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे, हवालदार हंगे आणि इतर सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून तक्रारदार सागर कदम यांना पोलीस स्टेशनच्या बाहेरील आवारातून अमानुषपणे फरफटत आत घेऊन गेले. आत नेल्यानंतर त्यांना लाथा, बुक्क्या, काठी, चामड्याचे बेल्ट इत्यादी गोष्टींनी जबर आणि अमानुष मारहाण करण्यात आली.

या गंभीर घटनेमुळे वडूज परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी ज्यांच्याकडे संरक्षणाची अपेक्षा करावी, त्यांनीच तक्रारदाराला अशा प्रकारे मारहाण केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button