Uncategorized

तुमच्या लाडक्या भावाचे कार्यालय सदैव सुरू : निलेश मोरे

निवडून येऊ अगर ना येऊ पण तुमच्या लाडक्या भावाचे कार्यालय सदैव सुरू.

सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. यावेळी अनेकांनी निवडणुकीपुरते जनसंपर्क कार्यालय सुरू केले. अन दुसऱ्याच दिवशी बंद केले. मात्र तुमच्या लाडक्या भावाचे जनसंपर्क कार्यालय सदैव सुरू असून ते जनतेची सेवा करण्यासाठी सुरूच राहणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी सांगितले.

निवडणुका जाहीर होताच अनेक हौसेनवसे नगरसेवक होण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिले. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल जनसंपर्क कार्यालय सुरू केले. काहींनी त्यातून माघार घेतली. सातारा नगरपालिका निवडणुकी साठी मंगळवार दि. दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेकांनी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय बंद केले मात्र गेले दहा वर्ष कोणतीही अपेक्षा न ठेवता सुरू केलेले जनसेवेसाठीचे संपर्क कार्यालय आजही सुरूच आहे.या कार्यालयाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष,लाडक्या बहिणी,रुग्ण व त्यांचे नातेवाईक, शालेय विद्यार्थी, खेळाडू या यासह सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावली आहेत आणि यापुढेही ती सुरूच राहणार आहेत याची ग्वाही निलेश मोरे यांनी दिली. यास महिलांसाठीचे विविध योजनाचे गरजूंना लाभ मिळवून देणे व त्यांच्यासाठीचे उपक्रम सुरू आहेत आणि यापुढेही सुरू राहणार असल्याचे सौ.मीनाक्षीताई मोरे यांनीही स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button