तारळे हायस्कूलच्या सुरेश शिंदे यांच्या उपकरणाला विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक.
पाटण तालुका गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर मॅडम, यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
तारळे-श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तारळे येथील श्री छत्रपती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक श्री सुरेश विठ्ठल शिंदे यांनी तयार केलेल्या स्वयंचलित वनस्पती पाणीपुरवठा प्रणाली या उपकरणाला पाटण तालुकास्तरीय 53 व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कैलासवासी वत्सला देवी देसाई स्कूल मरळी तालुका पाटण येथे हे विज्ञान प्रदर्शन दिनांक चार ते सहा डिसेंबर अखेर आयोजित करण्यात आले होते.प्रयोगशाळा सहाय्य गटामध्ये सुरेश शिंदे यांच्या उपकर णा ला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
त्यांना संस्थेचे सीईओ माननीय कौस्तुभ गावडे सर, विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे सर, सातारा जिल्हा विभाग प्रमुख माननीय शशिकांत काटे सर, विद्यालयाचे प्राचार्य जयंत साळुंखे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय दादा बारटक्के, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर सहकारी या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.



