Uncategorized

सातारा तालुक्यात 13 वर्षांच्या मुलीचे अपहरण : चार जणांविरोधात गुन्हा दाखल

सातारा तालुक्यात 13 वर्षांच्या मुलीचे अपहरण : चार जणांविरोधात गुन्हा दाखल.

सातारा तालुक्यातील एका गावात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता चार जणांनी चारचाकी वाहनातून येत आई, मुलगा आणि मुलगी या तिघांना धमकी देत जबरदस्तीने घेऊन गेले.

या घटनेत अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपींनी आई आणि मुलाला कासेगाव, तालुका पंढरपूर येथे सोडून दिले; मात्र 13 वर्षांची मुलगी अद्याप घरी परतली नाही. मुलीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती न मिळाल्याने पीडित मुलीच्या आईने पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

हा गुन्हा पुढील तपासासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, अपहरण आणि पोक्सो कायद्यान्वये चार संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांची नावे बायडाबाई कळकुंबे, गणेश कळकुंबे, भास्कर दांडगे आणि मनीषा दांडगे अशी आहेत.

या प्रकरणाचा तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button