Uncategorized

कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनी लि. कवठे येथे मा श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांची भेट !!

कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनी लि. कवठे येथे मा श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांची भेट !!

कवठे: महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट अंतर्गत कवठे येथील प्रकल्पास सातारा जिल्हाधिकारी मा .श्री संतोष पाटील यांनी आज कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीस भेट दिली .यावेळी आले व केळी ,पपई, हळद इत्यादी पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांसमवेत निर्यात आणि स्थानिक बाजारपेठे संदर्भात तसेच हळद पिक उत्पादन वाढ व हळद पावडर निर्याती संदर्भात माहिती दिली .

भारतात अनेक शतकांपासून रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर होत आहे. हळदीतील कुरक्युमीन आपल्या शरीरातील सुपर अँटीऑक्सिडंट ग्लूटाथिऑनची पातळी वाढविण्यास मदत करते. त्यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो. मेंदूतील चेतापेशींची वाढ होण्यास आवश्यक असलेल्या एका रसायनाची पातळीही कुरक्युमीनमुळे वाढते. विस्मरण, तसेच औदासीन्याची (डिप्रेशनचा) समस्या असलेल्या रुग्णांसाठीही हळद फायदेशीर आहे. इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी हळद उत्पादक शेतकरी तसेच कवठे गावातील शेती विषयी माहिती घेऊन महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री अजय शेंडे ,नोडल अधिकारी उपसंचालक कृषी व्यवसाय जिल्हा अंमलबजावणी कक्ष सातारा , वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे,श्रीमती भारती गावडे, स्मार्ट साताराचे अधिकारी श्री शशिकांत घाडगे,वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री राहुल डेरे,कवठे कृषी क्रांती कंपनीचे संचालक मा .श्री मधुकर डेरे, अतुल डेरे, कवठे गावच्या सरपंच सौ मंदाकिनी पोळ उपसरपंच शिवाजी डेरे, लक्ष्मी टिके ,प्रदीप डेरे, विश्वास पोळ, शंकरराव पोळ, शशिकांत करपे, दिलीप चव्हाण, रामदास डेरे, प्रवीण जाधव, नामदेव करपे हिंदुराव डेरे, विजय बाबरआनंदराव डेरे, प्रमोद डेरे, जयवंत डेरे, राजेंद्र डेरे, प्रवीण पोळ, रितेश डेरे, सुनील डेरे विक्रम डेरे, युवराज देशमुख, नितीन डेरे,रामदास डेरे , दीपक गुरव व कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button