सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार

सातारा, दि. ३० नोव्हेंबर २०२५
सातारा नगरपालिका निवडणूक २०२५ शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत एकूण ५१ सराईत गुन्हेगारांना सातारा तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे.
निवडणूक प्रक्रिया १ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार असून, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या धोक्याचा विचार करून मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
बी.एन.एस.एस. कलम १६३(२) अन्वये जारी आदेशानुसार, १ डिसेंबर २०२५ रोजी ००.०१ ते ३ डिसेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत हद्दपारी लागू राहणार असून, २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या ५१ गुन्हेगारांची यादी
१) जुनैद उर्फ झैद उर्फ जैद अय्याज बागवान – शनिवार पेठ, सातारा
२) सौरभ उर्फ कुक्या कैलास खरात – ढोरगल्ली, गुरुवार पेठ सातारा
३) प्रसाद नितीन साखरे – सदरबझार सातारा
४) रोहित जगन्नाथ नाईक – वसंतनगर, खेड सातारा
५) अबहुरेरा अस्लममिया गोलंदाज – केसरकर पेठ सातारा
६) सुदिप संजय मंगळे – कोयना सोसायटी, सदरबझार सातारा
७) विलास उर्फ यल्ल्या शरणप्पा कुरमणी – बॉम्बे रेस्टॉरन्ट सातारा
८) मयुर शिवाजी नेटके – मल्हारपेठ सातारा
९) आकाश शिवाजी नेटके – मल्हारपेठ सातारा
१०) विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे – रविवार पेठ सातारा
११) शुभम शनि कांबळे – केसरकर पेठ सातारा
१२) आकाश शनि कांबळे – केसरकर पेठ सातारा
१३) गौरव गणेश पाटणकर – केसरकर पेठ, आंबेडकर सोसायटी सातारा
१४) बलराम उर्फ करण हणमंत कुहाडे – आंबेडकर सोसायटी सातारा
१५) अनिल गुरव मोरे – आंबेडकर सोसायटी सातारा
१६) ऋषिकेश रामु विटकर – आंबेडकर सोसायटी सातारा
१७) गोपाळ गोविंद पाटणकर – आंबेडकर सोसायटी सातारा
१८) सचिन शामराव पाटणकर – आंबेडकर सोसायटी सातारा
१९) यशवंत उर्फ विशाल दशरथ विटकर – आंबेडकर सोसायटी सातारा
२०) अक्षय मधुकर तुपे – ११६ रविवार पेठ सातारा
२१) ओंकार कृष्णात देटके – गोडोली सातारा
२२) वृषभ राजेंद्र जाधव – १६७ रविवार पेठ सातारा
२३) चैतन्य विशाल माने – १५०(ब) रविवार पेठ सातारा
२४) सौद अहमद खान – जगतापवाडी, शाहूनगर सातारा
२५) अब्दुल इमाम सय्यद – गार्डन सिटी अपार्टमेंट, शाहूनगर



