निलेश अगोदरपासूनच प्रभागाचा नगरसेवक ना. शंभूराजे देसाई…
दोन्ही उमेदवारांच्या कामाचे भरभरून कौतुक केले ना. शंभूराजे देसाई

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीवर निलेश निलेश मोरे व मीनाक्षीताई मोरे यांनी पाऊल ठेवले आहे. गेली अनेक वर्ष निलेश हा शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तो काम करत आहे. नगरसेवकाची कामे तो अगोदरपासूनच करत असून तुमच्या प्रभागाचा नगरसेवक आहे. या दोघांचेही काम कौतुकास्पद असून यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचे काम पोचले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी केले.
प्रभाग 5 ब चे शिवसेना अधिकृत उमेदवार निलेश मोरे व 15 ब च्या शिवसेना अधिकृत उमेदवार मीनाक्षीताई मोरे यांच्या कोपरा सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांचे बंधू व ठाणे नगरसेवक प्रकाश शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख रणजीत भोसले, महिला तालुकाप्रमुख विद्याताई बर्गे, शाम गिते, ओबीसी प्रमुख पवित चोरगे, हरी बाबर आदी उपस्थित होते. सभेपूर्वी पालकमंत्री ना. देसाई यांनी पंथाचा गोड येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
ना. देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून निलेश शिंदे यांची वेगळी ओळख आहे. नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सातारा शहराच्या विविध विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. यातील विविध कामांसाठी निलेशनेही त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. निलेश च्या कामाची पद्धत खूप वेगळी आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेला हा निलेश 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करतो. त्याची एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांवर एकनिष्ठ आहे. गेली अनेक वर्ष तो प्रभाग शहर व जिल्ह्यातील जनतेची कामे निस्वार्थीपणे करत आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणे हा त्याच्या रक्तातील सर्वात वेगळा गुण आहे. निलेश च्या कामाप्रमाणे त्याची पत्नी मीनाक्षीताई याही काम करत आहेत. लाडकी बहीण योजनेत त्यांनी अनेक महिलांची कामे केली आहेत. अनेकजण राजकारण करण्यासाठी नगरपालिकेत जातात पण प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेत जायचे असते. आपला निलेश गेली अनेक वर्ष प्रभागासह शहरातील समस्या सोडवत आहे. निलेशचे कार्यालय सदैव सर्वांसाठी खुले असते. जिल्ह्यातील कोणत्याही गावातून सर्वसामान्य माणूस त्याच्याकडे मदतीसाठी येऊ शकतो असा आपला हक्काचा माणूस म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. नगरसेवकाची कामे तू खरंच आहे मात्र नगरसेवक झाल्यानंतर त्याहूनही अधिक जोमाने कामे करेल यात काही शंका नाही असा विश्वास ना देसाई यांनी व्यक्त केला.
ओंबळे म्हणाले, सातारा शहर आजही विकासाच्या बाबतीत अन्यायग्रस्त आहे. स्वच्छता, पाणी, वीज, दर्जेदार रस्ते या मूलभूत गरजांसाठी आजही नागरिकांना दररोज संघर्ष करावा लागतोय. अरुंद रस्ते, उघडी गटारे हे ज्वलंत प्रश्न आजही आपल्या दारात उभे आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी अनेकजण छत्रीसारखे उगवतात आणि निवडणूक संपली की पुन्हा गायब होतात. पण निलेश हा पहाडासारखे आहे. राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर दिला आहे आणि हे तुम्ही गेली दहा वर्षे पाहत आहात. त्याला नुसते आश्वासन द्यायला नाही, तर ठोस कृती करायला आवडते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली दहा वर्षे ८० टक्के समाजकारण आणि केवळ २० टक्के राजकारण केले आहे. आजपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत केंद्राच्या माध्यमातून सातारा शहर आणि जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्ण व नातेवाईकांना अठरा कोटींहून अधिक मदत मिळवून दिली असल्याचे सांगितले.



