सातारा तालुका पोलीस ठाण्याकडून २०२५ गणराया व नवदुर्गा अवॉर्ड बक्षीस वितरण समारंभ
सातारा तालुका पोलीस ठाणेकडुन २६/११ दिन निमित्त घेणेत आलेले रक्तदान शिबीर व सन २०२५ गणराया व नवदुर्गा अवॉर्ड बक्षीस वितरण समारंभ

मा.श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा साो, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर साो. व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले सोो यांचे मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश तांबे यांनी २६/११/२००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेल मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या सर्व भारतमातेच्या व बळी गेलेल्या निष्पाप पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार व नागरीकांना भावपुर्ण श्रध्दांजली प्रित्यर्थ सातारा तालुका पोलीस ठाणेचे वतीने रक्तदान शिबीर तसेच गणराया व नवदुर्गा अवॉर्ड बक्षीस वितरण समारंभ हा कार्यक्रम आयोजित केले होता. सदर रक्तदान शिबीर व गणराया व नवदुर्गा अवॉर्ड बक्षीस वितरण समारंभ करिता मा.श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा साो, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले सो, सातारा, मा. पोलीस निरीक्षक, सातारा शहर पो.स्टे. राजेंद्र मस्के साो.मा.सपोनि श्री. काटकर सातारा, पोउनि श्री. गुरव, सातारा तालुका पोलीस अंमलदार व रोटरी क्लब ऑफ सातारा, रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल, रो. किशोर डांगे, अध्यक्ष रो. क्लब ऑफ सातारा श्री अभिजीत लोणकर, श्री. नीरज गांधी, वकील.सुनील सांगळे, प्रा. धनंजय देवी, श्री. योगेंद्र सातपुते व सातारा तालुका पोलीस ठाणे हददीतुन बहुसंख्येने पोलीस पाटील, गणेश व नवरात्र मंडळांचे कार्यकर्ते/ पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर मध्ये तब्बल एकुण ४९ पोलीस बांधव, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे कार्यकर्ते/पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी रक्तदान केले. तसेच गणराया अवॉर्ड २०२५ मध्ये सहभागी झालेले सातारा तालुका पोलीस ठाणे हददीतील गणेश मंडळांचे १. परळी-शेंद्रे-यवतेश्वर २. कोंडवे वेण्णानगर ३. अंगापुर-तासागांव ४. लिंब-पाटखळ असे एकुण चार विभाग करणेत आले असुन प्रत्येक विभागामधेन प्रथम, दवीतीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी १६ गणेश मडंळ तसेच प्रत्येक विभागातुन उत्कृष्ठ एक गाव एक गणपती अशी ४ अशी एकुण २० गणेश मंडळांना व नवदुर्गा चार विभागातुन ४ दुर्गामंडळाना मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांचे हस्ते पुरस्कार देवुन गौरविण्यात आले आहे. तसेच उपस्थितांना मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी मार्गदर्शन केले.



