शिवसेनेची निवडणूक तयारी शिगेला; सातारा जिल्ह्यात 127 उमेदवारांची घोषणा
शिवसेनेची निवडणूक तयारी शिगेला; सातारा जिल्ह्यात 127 उमेदवारांची घोषणा

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच पालकमंत्री शंभूराजे देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे आणि जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने दमदार तयारी केली आहे.
सामान्य जनतेला न्याय मिळवून देणे, गोरगरिबांच्या अडचणी कमी करणे आणि विकासमुखी कार्य करणे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना सातारा जिल्ह्यात पूर्ण ताकदीने रिंगणात उतरली आहे. ‘लाडकी बहीण’ योजना, एसटी महिलांना अर्धे तिकीट अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवून शिवसेनेने लोकहितासाठी सातत्याने काम केले आहे. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही भूमिका सातत्याने जपण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, मेढा आणि फलटण या नगरपरिषदांमध्ये एकूण 127 उमेदवार उभे करण्यात आले असून जिथे शक्य तेथे युती, जिथे गरज तिथे आघाडी आणि आवश्यकतेनुसार एकला चलो रे या भूमिकेवर शिवसेना निवडणूक लढवत आहे.
सातारा नगरपरिषदेसाठी 14 अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून ते पुढीलप्रमाणे —
—
सातारा नगरपरिषद – शिवसेना (धनुष्यबाण) उमेदवार यादी
प्रभाग उमेदवाराचे नाव प्रवर्ग
2 अ संकेत संजय साठे अनुसूचित जाती (पुरुष)
3 ब शितल चंद्रहार जगदाळे महिला ओपन
5 ब निलेश सुभाष मोरे पुरुष
6 ब शिवाजी नारायण भोसले OBC पुरुष
7 ब नवाज रफीक शेख सर्वसाधारण
8 अ योगिता प्रणय गालपाडे SC महिला
15 अ अमोल अरुण पाटोळे अनुसूचित जाती पुरुष
15 ब मिनाक्षी निलेश मोरे महिला
16 अ संभाजी शिवाजी पाटील OBC पुरुष
16 ब कांचन गौरी शिंदे महिला
19 अ अनिता मंगेश जगताप महिला
19 ब प्रसन्न प्रभाकर अवसरे OBC पुरुष
22 अ गीता निलेश शिंदे ओपन महिला
22 ब बाळासोा पुंडलिक शिंदे ओपन पुरुष

जिल्ह्यात शिवसेनेचा वाढता प्रभाव, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता या निवडणुकीत शिवसेना निश्चित यश मिळवेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.



