Uncategorized

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भीषण अपघात भीषण अपघात

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भीषण अपघात भीषण अपघात.

धर्मवीर युवा मंच” या संस्थेचा जन्म ज्या हेतूसाठी झाला, ते म्हणजे गडकोट संवर्धन, गोमाता संरक्षण, गरीब कुटुंबांना वस्त्रदान, अपघातग्रस्तांना तातडीची मदत अशा विविध सामाजिक कार्यांसाठी त्या सर्व मूल्यांचा वसा या संस्थेच्या मावळ्यांनी मनापासून उचलला आहे.
आज संस्थेचा बारावा वर्धापनदिन… आणि त्याच दिवशी बॉम्बे रेस्टॉरंट, सातारा येथे एका ट्रकच्या पुढील टायर फुटल्याने ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली व महामार्गावर भीषण अपघात झाला. समयसूचकता आणि सामाजिक बांधिलकी जपत आपल्या संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रशांत नलवडे आणि महामार्ग सेवेत कार्यरत सचिव कल्पेश पोकळे यांनी गंभीर जखमींना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठीही मोलाचे योगदान दिले.
अपघाताच्या ठिकाणी केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका. मोबाईलमध्ये शूटिंग करण्यात मौल्यवान वेळ वाया घालवू नका. जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, त्यांच्या जीवाला आधार देणे—ही प्रत्येकाची मानवी जबाबदारी आहे.
तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना आणि प्रवाशांना मोकळा मार्ग करून देणे हेही आपले नैतिक कर्तव्य आहे. मानवतेचा हात पुढे करा, समाजासाठी उभे रहा, असे आवाहन या घटनेच्या निमित्ताने धर्मवीर युवा मंचने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button