Uncategorized

कोरेगाव उत्पादन शुल्क प्रकरणात तत्कालीन दुय्यम निरीक्षकास ३ वर्ष सश्रम कारावास.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई निष्पन्न; कॉस्टेबलची निर्दोष मुक्तता.

कोरेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ५८/२०१७ मधील लाच प्रकरणात मा. विशेष न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा यांनी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत तत्कालीन दुय्यम निरीक्षक भिवा लक्ष्मण येळे यांना दोषी धरून ३ वर्ष सश्रम कारावास आणि १,१०,००० रुपये दंड, तर दंड न भरल्यास ७ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपी क्रमांक २ भगवान भालगुराम पवार, तत्कालीन कॉस्टेबल, उत्पादन शुल्क विभाग यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

घटनेत तक्रारदाराच्या ड्रायव्हरवर दारू वाहतुकीप्रकरणी दाखल गुन्ह्यात जप्त मोटारसायकल सोडण्यासाठी दुय्यम निरीक्षक येळे यांनी ५,००० रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम कॉस्टेबल पवार यांच्या मार्फत घेण्याचे त्यांनी सांगितले होते. ला.प्र.वि. सातारा घटकाने सापळा कारवाई करून लाच मागणी व स्वीकाराच्या हालचालींची खात्री केली.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. एस. कुरळे यांनी पूर्ण करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. स्पेशल केस क्रमांक १९/२०१७ म्हणून खटल्याची सुनावणी झाली. सहायक सरकारी अभियोक्ता श्री. एम. एच. ओक यांनी शासनाची बाजू मांडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे तसेच अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांनी नागरिकांनी कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांचा एजंट लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

तक्रारीसाठी संपर्क:
• कार्यालयीन फोन: ०२१६२–२३८१३९
• हेल्पलाईन: १०६४
• मोबाईल: ७०५७५७१०६४

(श्री. राजेश वसंत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. सातारा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button