Uncategorized

शाहुपुरी पोलिसांची धडक कारवाई : बॅटरी चोरी प्रकरणी एकास अटक, १० बॅटऱ्या जप्त

बॅटरी चोरी प्रकरणी एकास अटक, १० बॅटऱ्या जप्त

शाहुपुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने वाढत्या बॅटरी चोरीच्या प्रकरणावर कारवाई करत दत्ता बबन ठोंबरे (वय ३३ वर्षे), रा. पिलेश्वरीनगर, करंजे, यास अटक केली असून विविध चारचाकी वाहनांमधून चोरीस गेलेल्या १० बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,
झेडपी कॉलनी, म्हसवेरोड, करंजे परिसरात उभ्या केलेल्या ट्रकवरील अॅमरॉन कंपनीच्या १५ हजार रुपयांच्या दोन बॅटऱ्या चोरीस गेल्याची फिर्याद रमेश रघुनाथ शेडगे (रा. करंजेपेठ) यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी शाहुपुरी पोलिसात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरी परिसरातीलच एका व्यक्तीने केल्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार व फिर्यादी यांच्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत त्यास दत्ता ठोंबरे यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने गेल्या तीन महिन्यांत वाढेफाटा व करंजे परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमधून बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण १० बॅटऱ्या हस्तगत केल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास म.पो.हवा. सोनाली माने या करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन म्हेत्रे, पो.उप.नि. विजय शिर्के, म.पा. हवा. सोनाली माने, पो.हवा. निलेश काटकर, सुरेश घोडके, संदीप मदने यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button