Uncategorized

YouTube चैनल किरण प्रकाश मोरे शिरवळ येथील पत्रकार सातारा आणि पुणे जिल्ह्यातून हद्दपार….सातारा पोलीस अधीक्षक आदेश

YouTube चैनल किरण प्रकाश मोरे शिरवळ येथील पत्रकार सातारा आणि पुणे जिल्ह्यातून केले हद्दपार...

किरण प्रकाश मोरे रा शिरवळ यास दोन वर्षाकरीता पुणे व सातारा जिल्हयातुन केले हद्दपार…

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सो वाई विभाग वाई यांचा आदेश.शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील किरण प्रकाश मोरे वय ३७ वर्षे मुळ रा कर्नावड ता भोर जि पुणे हल्ली रा सटवाई कॉलनी शिरवळ ता खंडाळा जि सातारा यास डॉ. योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वाई उपविभाग वाई यांनी पुणे व सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता हद्दपार केलेचा आदेश पारीत केला आहे.मौजे सटवाई कॉलनी शिरवळ ता खंडाळा येथे सध्या वास्तव्यास असणारा यु ट्युब पत्रकार किरण प्रकाश मोरे यय ३७ वर्षे याने शिरवळ पोलीस ठाणे (१) गुन्हा रजि नबंर ५६/२०२३ भादवि कलम ३५४.३२७.३२४.३२३.५०४.५०६.३४ (२) गुन्हा रजि नबंर २५५/२०२४ बी एन एस कलम ३०८ (२).३५२.३५१ (२) (५). (३) गु.र.नं.३१०/२०२४ आय टी अॅक्ट ६७ (अ) नुसार शिरवळ पोलीस ठाणेत गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शिरवळ पोलीस ठाणेतुन हददपार इसमास सुधारणेची संधी देऊन सुध्दा त्याचे वर्तनात कोणत्याही प्रकारे सुधारणेची शक्यता दिसत नसलेने व त्याचे कृत्यामुळे व त्याचेवर दाखल असले विविध गुन्हयाची पार्श्वभुमी पाहुन व त्याचेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा तसेच दखलपात्र गंभीर स्वरुपाचे गुन्हे घड्डु नये म्हणुन सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक श्री तुषार दोशी सो, अपर पोलीस अधिक्षक डॉ वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग श्री विशाल खांबे यांचे निर्देशानुसार किरण प्रकाश मोरे यास पुणे व सातारा जिल्हयातुन हददपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाई उपविभाग वाई यांचेकडे शिरवळ पोलीस ठाणेतुन पाठविणेत आला होता. या प्रस्तावाची सुनावणी डॉ. योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वाई उपविभाग वाई यांचे समोर होऊन डॉ योगेश खरमाटे यांनी चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांनी केले शिफारशी प्रमाणे सातारा व पुणे जिल्हयातुन दोन वर्षाचे कालावधीकरीता हद्दपार आदेश क्रं एम.ए.जी. / हदपार / एस.आर/०३/२०२४ वाई दि.१२/११/२०२५ अन्वये पारीत केला आहेसदरची कारवाई मा. तुषार दोशी साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत नलवडे पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे, यांनी पाठविले हददपार प्रस्तवा नुसार झाली आहे.तरी सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की हददपार इसम १. किरण प्रकाश मोरे व त्याचे साथीदार विशाल महादेव जाधव व इरफान दिलावर शेख यांनी कोणाकडुन धमकी देऊन रोख रक्कम किंवा काही वस्तुची मागणी केली असलेस निर्भयपणे शिरवळ पोलीस स्टेशन येथे तक्रार देणेस यावे आपले नाव पत्ता गुप्त ठेवले जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button