तपासाला गती येणार, एसआयटी तपास पथकामध्ये ‘या’ अधिकाऱ्यांची केली नेमणूक.
तपासाला गती येणार, एसआयटीच्या तपासामुळे
तपासाला गती येणार, एसआयटी तपास पथकामध्ये ‘या’ अधिकाऱ्यांची केली नेमणूक.
फलटण येथील पिडीत महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी प्रमुख तथा समादेशक राज्य राखीव बल गट क्रं-१ च्या तेजस्वी सातपुते यांनी विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.याबाबतचे आदेश समादेशक तेजस्वी सातपुते यांनी निर्गमित केले आहे.
या विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, तपास अधिकारी तथा फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पुणे ग्रामीण लोणावळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष तपास पथकामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने तपासाला गती मिळणार आहे



