उपजिल्हा रुग्णालय फलटण.
फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे मृत महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येप्रकरणी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत घटनेच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आवश्यक दिशा व उपाययोजना ठरविण्यात आल्या.
बैठकीदरम्यान डॉक्टर समुदायातील सुरक्षित कार्यपरिसर, मानसिक आरोग्य, तसेच महिला डॉक्टरांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस मा. आमदार सचिन पाटील, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार जोशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी (सिव्हिल सर्जन) डॉ. युवराज करपे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे, तहसीलदार श्री. अभिजीत जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धुमाळ अंशुमन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील, तसेच डॉ. स्वाती लंबाते, डॉ. दीपा भोसले, आणि डॉ. धनश्री पाटील उपस्थित होत्या.




