Uncategorized

कोटेश्वर मैदानासमोर विनापरवाना कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल.

कोटेश्वर मैदानासमोर विनापरवाना कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाख

सातारा: कला वाणिज्य कॉलेजजवळील कोटेश्वर मैदानासमोर विनापरवाना आणि कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम वाजवून पोलीस आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका साऊंड सिस्टीम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट २०२६) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक लक्ष्मण पोळ हे गस्तीवर असताना, कोटेश्वर मैदानासमोर ‘एकदंत साऊंड सिस्टीम’चा मालक सुरज संजय कदम (वय ३०, रा. खेड, जि. सातारा) हा त्याच्या टाटा ४०७ वाहनात (क्र. MH 11 BL 7500) साऊंड सिस्टीम ठेवून अत्यंत मोठ्या व कर्णकर्कश आवाजात वाजवताना आढळला.

पोलीस हवालदार पोळ यांनी कदम याला साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच साऊंड सिस्टीम वाजवण्याबाबत पोलीस ठाण्याची रीतसर परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली असता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आरोपीने साऊंडचा आवाज मोठाच ठेवल्याने, दिलेल्या शासकीय आदेशांचे व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार दिपक पोळ यांनी तक्रार दिली असून, पो.हवा. वाघ यांनी गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button